एमएमआरडीएने रद्द केल्या मोनो रेल्वेसाठी आलेल्या चिनी कंपन्यांच्या निविदा


मुंबई : लडाखमध्ये घडलेल्या घटनेनंतर भारताकडून चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. बीएसएनएल, रेल्वे अशा बड्या विभागानंतर आता महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारितील असलेल्या एएमआरडीएने त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवले आहे. 10 मोनो रेल्वे तयार करण्यासाठी चायनीज कंपन्यांकडून मागवण्यात आलेल्या निविदा एमएमआरडीने रद्द केल्या आहेत.

मोनो रेल्वेसाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी या निविदा दोन चीनी कंपन्यांनी पाठवल्या होत्या. पण एमएमआरडीएकडे त्यांच्याकडून सातत्याने नियम-अटी आणि पात्रतेच्या निकषांबाबत पुनर्विचार करण्याची मागणी होत होती. पण सद्यपरिस्थितीत या कंपन्यांची निविदा प्रक्रिया रद्द करुन भारतीय कंपन्यांना ते काम देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

एमएमआरडीएच्या मते, मेक इन इंडिया योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी, भारत सरकारने विविध धोरणे जाहीर केली आहेत. त्यानसुार विकास आणि दीर्घकालीन समर्थनासाठी भारतीय कंपनीचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेता सध्याची निविदा रद्द करुन तातडीने नवी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. भारतीय कंपन्यांचा सहभाग सक्षम करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रकल्पांवर मागील दहा वर्षांपासून पात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आता अशा प्रकल्पांसाठी भारतीय कंपन्या भेल, बीईएमएल इत्यादी भारतीय कंपन्यांसोबत बातचीत सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment