सुशांतच्या बायोपिकचे पहिले पोस्टर रिलीज; हे आहे चित्रपटाचे नाव


मुंबईमधील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. पण त्यानंतर त्याने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आणि नैराश्यामुळे आत्महत्या केल्याची सध्या सर्वत्र होत आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर दुःखी असलेल्या प्रत्येक देशवासियाला त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे जाणून घ्यायचे आहे. मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्येचा तपास करत आहेत. सुशांतच्या घरात सुसाईड नोट मिळाली नसली तरी 5 डायऱ्या हाती लागल्या आहेत. यातून सुशांतच्या दुःखाचे, आत्महत्येचे गुढ उकलेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान लवकरच आपल्याला सुशांतचा जीवनपट चित्रपट रुपात पाहायला मिळेल. नुकतेच बॉलीवूडचा स्वयंघोषित सिनसमीक्षक अभिनेता कमाल आर. खान त्याच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटाद्वारे तो सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांना एक्सपोज करणार असल्याचे ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.


तर नव्याने मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते विजय शेखर गुप्ता देखील सुशांतचा जीवनपट रुपेरी पडद्यावर बनवणार आहेत. ‘सुसाईड और मर्डर ए स्टार व्हॉज लॉस्ट’ (Suicide or Murder? A Star Was Lost) असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. नुकतेच त्यांनी या चित्रपटाचे एक पोस्टरदेखील रिलीज केले आहे.

विजय गुप्ता यांनी या चित्रपटाबाबत माहिती देताना सांगितले, की सिनेसृष्टीतील बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सची असलेली कंपूशाही नष्ट करण्यासाठी हा आपण हा चित्रपट बनवू इच्छित आहोत. आपण याद्वारे बॉलिवूडला पूर्णपणे एक्सपोज करणार आहे. बाहेरुन अनेक प्रतिभासंपन्न मुले कामाच्या शोधात सिनेसृष्टीत पाऊल ठेवतात. पण यात खूप कमी लोकांना यश मिळते. कारण येथे बॉलिवूडमधील काही मोजक्या मंडळींचे राज्य आहे. हा चित्रपट सुशांत सिंह राजपूतचा बायोपिक नसून सुशांतच्या जीवनप्रवासाने प्रेरित झालेला असेल. यामुळे सिनेसृष्टीचे खरे रुप लोकांसमोर येईल. प्रत्येकाला बॉलिवूडमध्ये काम करण्याचा हक्क आहे. मग ती व्यक्ती बॉलिवूड परिघातील असेल किंवा बाहेरची.

Leave a Comment