कृष्णभक्तांच्या संतापानंतर मोरारी बापूंचा माफीनामा


द्वारका: भगवान श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम हे मद्यपी होते आणि कृष्णाचे द्वारकामधील राज्य फेल असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गुजरातच्या द्वारकामधील जगप्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू हे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर कृष्णभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती. सर्वस्तरांतून मोरारी बापूंच्या वक्तव्याचा विरोध झाल्यानंतर अखेर त्यांनी माफी मागितली आहे. एक व्हिडीओ शेअर करत मोरारी बापूंनी कृष्ण भक्तांची माफी मागितली आहे.

दरम्यान एका भाजपच्या माजी आमदाराने काल मोरारी बापूंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. मोरारी बापू यांच्या एका वक्तव्यावर माजी आमदार पबुभा माणेक हे नाराज होते. त्यांनी त्यावरुन मोरारी बापूंवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मोरारी बापू आणि माणेक समोरासमोर आल्यानंतर हा प्रकार घडला. यावेळी खासदार पूनम माडम यांनी मध्यस्थी केल्याने हे प्रकरणे निवळले.

माहितीनुसार मोरारी बापू यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यांनी ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम हे मद्यपी होते आणि कृष्णाचे द्वारकामधील राज्य फेल होते, असे म्हटले होते. काल ते द्वारकामध्ये या वक्तव्यानंतर माफी मागण्यासाठी आले होते. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या विरोधी वक्तव्य कथाकार मोरारी बापू यांना चांगलेच महागात पडले. भाजपचे माजी आमदार पबुभा माणेक माफी मागायला आलेल्या मोरारी बापू यांच्या समोर आले त्यावेळी त्यांनी मोरारी बापूंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, सर्वच स्तरांतून मोरारी बापूंच्या वक्तव्याचा विरोध झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. एक व्हिडिओ शेअर करत मोरारी बापूंनी श्रीकृष्ण भक्तांची माफी मागितली आहे. व्हिडीओमध्ये बापू म्हणतात की, जर माझ्यामुळे कोणी दु:खी होण्यापूर्वी मला समाधी घेणे आवडेल. सदर व्हिडीओमध्ये मोरारी बापू खूप अस्वस्थ दिसत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील वाहात होते. हे अश्रू माझ्या डोळ्यातून नव्हे तर आत्म्यातून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment