इस्त्रायलने सुशांतला वाहिली श्रद्धांजली, म्हणाले आमचा खरा मित्र

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या वृत्तातून अद्याप अनेकजण सावरलेले नाही. प्रतिभावान कलाकारच्या अशा मृत्यूमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या कलाकाराला श्रद्धांजली वाहिली. जगभरातून सुशांतला श्रद्धांजली वाहिली जात आहे. इस्त्रायलने देखील सुशांतसाठी खास संदेश लिहित, त्याला आपला खरा मित्र म्हटले आहे.

इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्रालयाचे जनरल आणि डेप्युटी डायरेक्टर गिलाड कोहेन यांनी या अभिनेत्याच्या आठवणीत ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, मी सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर संवेदना व्यक्त करतो. तो इस्त्रायलचा खरा मित्र होता. तुझी खूप आठवण येईल. जेव्हा तो इस्त्रायलला आला होता, तेव्हा असे काही झाले होते. असे म्हणत सोबत त्यांनी एक लिंक देखील शेअर केली.

सुशांतच्या शेवटच्या ड्राईव्ह या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग इस्त्रायलमध्ये झाले होते. मखना या गाण्यावेळी ड्राईव्ह चित्रपटातील कलाकार इस्त्रायलमध्ये होते. त्याच गाण्याची लिंक त्यांनी शेअर केली आहे.

Leave a Comment