करण, सलमानविरोधात ऑनलाईन पिटिशन; लाखों लोकांनी केल्या सह्या


मुंबईमधील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सुशांत ही आत्महत्या बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून केल्याची चर्चा आता सर्वच माध्यमांमध्ये सुरु आहे. त्यातच या घराणेशाहीमागे सलमान खान आणि करण जोहर हेच जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान एक ऑनलाईन पिटिशनदेखील या दोघांविरोधात सुरु करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे लाखो लोकांनी सलमान खान आणि करण जोहरला धडा शिकवण्यासाठी त्यावर नोंदणी केली आहे.

ही पिटिशन जयश्री शर्मा श्रीकांत नावाच्या एका फेसबुक युझरने सुरु केली आहे. ही ऑनलाईन पिटिशन सुशांत सिंह राजपुतला न्याय मिळावा. सलमान आणि करण विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी व त्यांच्या चित्रपटांवर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकावा यासाठी सुरु करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ही पिटिशन १६ जूनला सुरु झाली आणि २४ तासांमध्ये १६ लाख ८५ हजार लोकांनी यावर नोंदणी केली. आतापर्यंत तीस लाखांपेक्षा अधिक लोकांनी या पिटिशनवर सही केली करुन करण-सलमान विरोधात संताप व्यक्त केला आहे. सध्या सोशल मीडियाद्वारे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका केली जात आहे. करण जोहरचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स देखील कमी झाले आहेत.

Leave a Comment