कोरोनामुळे जगभरातील 4.5 लाख लोकांनी गमावला आपला जीव


नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता 84 लाखांच्यावर पोहोचली आहे. तर या जीवघेण्या रोगाने आतापर्यंत साडे चार लाख लोकांचा बळी घेतला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरात 83 लाख 92 हजार 582 लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 4 लाख 50 हजार 452 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर योग्य उपचारानंतर 44 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जवळपास 62 टक्के कोरोनाबाधित जगभरातील 8 देशांमध्ये आहेत.

अमेरिकेमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येतो. अमेरिकेतील 22 लाखांहून अधिक लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर एक लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण, ब्राझीलमध्ये आता दरदिवशी अमेरिकेहून अधिक कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. तसेच दरदिवशी सर्वाधिक मृतांची नोंदही ब्राझीलमध्ये करण्यात येत आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोनाबाधितांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे.

ब्राझील, रशिया, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथ एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. चार देश (अमेरिका, ब्राजील, ब्रिटेन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.20 लाखांवर पोहोचला आहे. तर भारताचा समावेश टॉप-4 कोरोनाबाधित देशांमध्ये झाला आहे.

Leave a Comment