संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर (UNSC) भारताची अस्थायी सदस्यपदी निवड

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या तात्पुरत्या सदस्यपदी दोन वर्षांसाठी भारताची निवड करण्यात आली आहे. भारताला जनरल एसेंबलीमध्ये 192 पैकी 184 मते मिळाली. भारतासह आयर्लंड, मॅक्सिको आणि नॉर्वे या देशांना देखील संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या तात्पुरत्या सदस्यपदी निवडण्यात आले आहे.

2021-22 या कार्यकाळासाठी भारत आशिया-पॅसिफिक वर्गातून उमेदवार होता. मात्र या वर्गातून एकच उमेदवार असल्याने भारताची सदस्यपदी सहज निवड झाली. या आधी भारताची तात्पुरता सदस्य म्हणून 1950-1951, 1967-1968, 1972-1973, 1977-1978, 1984-1985, 1991-1992 आणि 2011-2012 अशी सात वेळा निवड झाली होती. त्यामुळे आता भारताची आठव्यांदा या पदी निवड झाली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या जनरल एसेंबलीमध्ये 75व्या अधिवेशनासाठी अध्यक्ष, सुरक्षा परिषदेसाठी 5 तातपुरते सदस्य आणि आर्थिक-सामाजिक परिषदेच्या सदस्यासाठी देखील मतदान पार पडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारताची संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये निवड झाल्याने पाठिंबा देणाऱ्या देशांचे आभार मानले. भारत जगात शांती, सुरक्षा, निःपक्षपातपणासाठी सर्व सदस्य देशांबरोबर काम करेल असे त्यांनी म्हटले.

Leave a Comment