सुशांतच्या आत्महत्येनंतर ‘डिप्रेशन’ हा शब्द गुगलवर केला गेला जास्त सर्च


मुंबई – आपण ज्याप्रमाणे शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतो, त्याचप्रकारे आपण आपल्या मानसिक स्वास्थ्याकडेही आवर्जुन लक्ष दिले पाहिजे. त्याच पार्श्वभूमीवर ही गोष्ट अधोरेखित करत देशात मानसिक आरोग्याविषयी जनजागृतीला गेल्या काही वर्षांपासून सुरुवात झाली.

पण आपल्या अनेकांना अद्यापही नैराश्य म्हणजे काय हे माहित नाही. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मानसिक आरोग्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा होऊ लागली. रविवारी (१४ जून) आपल्या मुंबईतील राहत्या घरी सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप कळू शकले नसले तरी, त्याने हे टोकाचे पाऊल नैराश्यामुळे उचलल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान गुगलवर या घटनेनंतर डिप्रेशन म्हणजे काय? याची सर्वाधिक शोधाशोध सुरु झाली. नेटकऱ्यांनी मागील २४ तासात ‘डिप्रेशन’ हा शब्द कोरोनापेक्षाही जास्त वेळा सर्च केला आहे. या देशातील केरळ, नागालँड, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये हा शब्द जास्त केला गेला. नेटकऱ्यांनी गुगलच्या माध्यमातून सुशांतच्या डिप्रेशनमागचे कारण, डिप्रेशनचा अर्थ काय याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न केला.

Leave a Comment