मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण भारतात वाढत चालले आहे. आता इलेक्ट्रिक्स वाहन बनवणारी कंपनी अँपिअर इलेक्ट्रिकने (Ampere Electric) भारतात मॅग्नस प्रो स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची खास गोष्ट म्हणजे सिंगल चार्जमध्ये 95 किमी अंतर पार करू शकते. या स्कूटरला मॅटेलिक रेड, गोल्डन येलो, ब्लूइश पर्ल व्हाइट आणि ग्रेफाइट ब्लॅकमध्ये सादर करण्यात आले आहे. या स्कूटरची किंमत 73,900 रुपये ठेवण्यात आली असून, कंपनीच्या वेबसाईटवरून बुकिंग करता येईल. याशिवाय देशभरातील 200 पेक्षा अधिक डिलरशिप्सकडे देखील स्कूटरचे बुकिंग करता येईल.
आली नवी इलेक्ट्रिक स्कूटर, 15 पैशात चालणार 1 किमी

कंपनीने सांगितले की, कोणत्याही सर्वसाधारण स्कूटरचा वार्षिक खर्च 27 हजार रुपये असतो. तर इलेक्ट्रिक स्कूटरसाठी हा खर्च केवळ 2700 रुपये असेल. या प्रमाणे इलेक्ट्रिक स्कूटरचा इंधन खर्च केवळ 15 पैसे प्रति किमी आहे. कंपनीकडून 3 वर्षांची स्टँडर्ड आणि 2 वर्षांची एक्सटेंडेट वॉरंटी देखील यावर दिली जात आहे.

मॅग्नस प्रो इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 1200 वॉट इलेक्ट्रिक मोटरसोबत 60व्ही क्षमतेची इलेक्ट्रिक बॅटरी देण्यात आलेली आहे. स्कूटरमध्ये इको आणि क्रूज ड्राईव्ह मोड देण्यात आलेले आहेत. कंपनीचा दावा आहे की चालकाला फुल चार्जिंगमध्ये इको मोडमध्ये 100 किमी आणि क्रूज मोडमध्ये 80 किमी रेंज मिळेल. स्कूटरला पुर्ण चार्ज होण्यासाठी 6 तास लागतात. यात 10 लीटरचे बूट स्पेस देण्यात आले आहे आणि फ्रंट पॉकेटमध्ये स्मार्टफोन चार्जर देखील मिळतो.