आयबीपीएसमध्ये नोकरीची संधी, प्रतिमाह 2.3 लाख पर्यंतचा पगार

इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (आयबीपीएस) मध्ये अनेक पदांसाठी भरती केली जात आहे. प्रोफेसरपासून ते एनालिस्टपर्यंत अशा वेगवेळ्या पदांसाठी ही भरती केली जात आहे.  या पदांसाठी नोकरी मिळणाऱ्या उमेदवाराला 40 हजार रुपये ते 2.33 लाख रुपये महिन्याला पगार मिळेल. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

पदे –

एकूण 29 पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये प्रोफेसर – 2, असोसिएट प्रोफेसर – 2, असिस्टेंट प्रोफेसर – 4, फॅकल्टी रिसर्च असोसिएट – 5, रिसर्च असोसिएट – 5, रिसर्च असोसिएट (टेक्निकल) – 1, हिंदी ऑफिसर – 3, एनालिस्ट प्रोग्रामर – 3, आयटी एडमिनिस्ट्रेटर – 1 आणि प्रोग्रामिंग एनालिस्ट – 3 या पदांचा समावेश आहे.

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 10 जूनला सुरू झाली असून, अर्जाची अंतिम तारीख 30 जून 2020 आहे. उमेदवाराची निवड परिक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल. परिक्षेची संभाव्य तारीख 17 जुलै 2020 आहे. वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता देखील वेगवेगळी आहे. उमेदवाराचे वय हे किमान 21 आणि कमाल 55 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे.

इच्छुक व पात्र उमेदवार अधिक माहिती व अर्जासाठी आयबीपीएसची अधिकृत वेबसाईट ibps.in ला भेट देऊ शकतात.

Leave a Comment