जोधपूरच्या या तलावात आढळले शेकडो मृत मासे, उभे राहिले नवे जल संकट

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील सोयला गावातील एका कोरड्या तलावात शेकडो मृत माशे आढळळ्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील जल संकटाबाबत चिंता निर्माण झाली आहे. कारण सध्या पश्चिम राजस्थानमधील भागात तापमान वाढत चालले आहे व पावसाला अजून 15 दिवस बाकी आहेत. आता गावकऱ्यांनी या तलावांना पुन्हा भरण्यासाठी टँकरने पाणी आणण्यासाठी पैसे जमा केले आहेत. यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत काही मासे तर जिंवत राहतील अशी आशा आहे.

तहसीलदाराने सांगितले की, तलावातील पाण्याचा स्तर कमी झाल्याने माशांचा मृत्यू झाला. आम्ही पाण्याच्या टँकरसाठी प्रत्येकाने 300 रुपये दिले. आता तलावात पाणी टाकले जात आहे. जेणेकरून इतर मासे तरी जिंवत राहतील.

वाढणाऱ्या तापमानासोबत कोरोनाच्या संकटामुळे हॉस्पिटलमध्ये पाणी पुरवठा आणि सॅनिटेशनच्या कामासाठी फायर डिपार्टमेंटला देण्यात येणाऱ्या पुरवठ्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील जलाशयांवर परिणाम होत आहे. जन आरोग्य आणि इंजिनिअरिंग विभागाला पावसाळा येईपर्यंत पाणी पुरवठा कमी करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, हवामान खात्यानुसार मान्सून राजस्थानमध्ये 14 जूनला दाखल होईल व 8 जुलैपर्यंत संपुर्ण राज्यात पोहचेल.

Leave a Comment