चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९७ हजारांच्याही पुढे


मुंबई – मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ३६०७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे १५२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर मागील २४ तासांमध्ये १५६१ बऱ्या झालेल्या रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. आत्तापर्यंत राज्यातील ४६ हजार ७८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर कोरोना रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ९७ हजार ६४८ झाली आहे. २४ तासांमध्ये ३६०७ रुग्ण आढळणे ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या असल्याचे महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.

दरम्यान पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्राचा ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी बोलताना कोरोना लढाईला तीन महिने होत आहेत, याकाळात राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधांची निर्मिती होत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Comment