राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ९० हजारांचा टप्पा


मुंबई – राज्यात काल दिवसभरात २२५९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९० हजार ७८७ वर पोहचला आहे. तर आत्तापर्यंत राज्यातील ४२ हजार ६३८ कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या घडीला ४४ हजार८४९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. १२० मृत्यूंची मागील २४ तासांमध्ये नोंद झाल्यामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या ३ हजार २८९ झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यात काल १६६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या ४२ हजार ६३८ एवढी झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात ४४ हजार ८४९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ४६.९६ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यू दर हा ३.६ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात ५ लाख ६८ हजार ७३ रुग्ण होम क्वारंटाइन आहेत तर २६ हजार ४७० रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

१२० मृत्यूंची मागील २४ तासांमध्ये नोंद झाली आहे. यामध्ये ८० पुरुष तर ४० महिला आहे. यामध्ये ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांची संख्या ६२ होती. तर ४७ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. ११ जणांचे वय हे ४० वर्षांखालील होते. गेल्या २४ तासांमध्ये मृत्यूंपैकी ४९ मृत्यू हे मागील दोन दिवसांमधले आहेत. आजवर पाठवण्यात आलेल्या ५ लाख ७७ हजार ८१९ नमुन्यांपैकी ९० हजार ७८७ पॉझिटिव्ह आले आहेत.

Leave a Comment