ऑस्ट्रेलियाची माजी सुपरकार ड्रायव्हर आणि रेसर रीने ग्रेसीने रेसिंग सोडून आता चक्क अडल्ड इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले आहे. आता ती रेसिंग ऐवजी पॉर्न इंडस्ट्रीत काम करत आहे, विशेष म्हणजे ती यात खूष देखील आहे. रेसिंगमध्ये पैस नव्हते. आर्थिक स्थिती बिकट झाली होती. आता या इंडस्ट्रीमध्ये नाव, पैसे आणि काम तिन्ही असल्याचे ती सांगते.
गरीबीमुळे ही रेसिंग ड्रायव्हर झाली पॉर्न स्टार, आता करत आहे लाखोंची कमाई
काही दिवसांपुर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रीनेने सांगितले की, हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. याने माझी लाईफस्टाईलच बदलून टाकली. या कामात घरचे देखील पाठिंबा देतात. वडिलांना माझ्यावर गर्व आहे. कारण मी आता संपुर्ण घराची जबाबदारी उचलत आहे. आधी कुटुंबाची मदत पैशांद्वारे करू शकत नव्हते.

तिने सांगितले की, पैसे नसल्यामुळे मोटर स्पोर्ट्स सोडावे लागले. रेसिंगमध्ये पैसे नव्हते. कुटुंबाला आर्थिक अडचणी येत होत्या, त्यामुळे हा निर्णय घेतला. तिने सुपर2 सीझनच्या 17 रेसमध्ये भाग घेतला. मात्र एकाच रेसमध्ये ती बाहेर पडली. तिने 2015 मध्ये रेसिंग करियर सुरू केले होते.

ती म्हणाली की, रेसिंगमध्ये जेव्हा रेसिंग होईल तेव्हाच पैसे मिळतात. काम देखील कमी असते. मात्र पॉर्न इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक आठवड्याला 25 हजार डॉलर (जवळपास 19 लाख रुपये) कमाई होते. 2017 मध्ये ड्रॅगन रेसिंगमध्ये 5 राउंडनंतर बाहेर काढल्यानंतर तिने या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. तिने स्वतःची वेबसाईट देखील बनवली आहे. जेथे ती स्वतःच्या फोटो आणि व्हिडीओ बदल्यात पैसे घेते. तिने सांगितले की, सुरूवातीला हे काम सुरू केले तेव्हा थोडे वेगळे वाटले. मात्र पैसे मिळाल्यावर या क्षेत्रात नाव आणि पैसा दोन्ही असल्याचे लक्षात आले.