दीपिका बॉडीगार्डला मानते भाऊराया

फोटो साभार नवभारत टाईम्स

बॉलीवूड सेलेब्रिटी गर्दीपासून संरक्षणासाठी वैयक्तिक बॉडीगार्ड ठेवतात हे आता नेहमीचे दृश्य झाले आहे. सलमान खान, शाहरुख खान यांचे बॉडीगार्ड सुद्धा सोशल मीडियावर सेलेब्रिटी झाले आहेत. त्यांच्याविषयी सतत काही ना काही छापून येत असते. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासोबत सुद्धा बॉडी गार्ड असतो आणि दीपिका सार्वजनिक कार्यक्रमात जाते तेव्हा त्याला अनेकदा पाहिले गेले आहे.

दीपिकाच्या बॉडीगार्डचे नाव जलाल आहे. तो गेली अनेक वर्षे दीपिकासोबत आहे. दीपिकाचे आणि त्याचे नाते तयार झाले असून दीपिका प्रत्येक रक्षाबंधनाला त्याला राखी बांधते. म्हणजे तो तिच्या कुटुंबातील एक सदस्य बनला आहे.

२०१८ मध्ये दीपिका रणवीरचे लग्न झाले तेव्हा दीपिकाचे अनेक नातेवाईक इटली येथील लेक कोमो येथे हजर राहू शकले नव्हते पण जलाल लेक कोमो येथे वधूपक्षाकडून हजर होता. दीपिका त्याला किती पगार देते या विषयी कधीच काही बोललेली नाही. मात्र काही वर्षांपूर्वी जलाल याला दीपिका वर्षाला ८० लाख रुपये पगार देते असे सांगितले जात होते. ही काही वर्षापूर्वीची गोष्ट असल्याने आता दीपिका जलाल याला वर्षाला किमान १ कोटी पगार देत असावी असा अदांज केला जात आहे.

Leave a Comment