झूमला टक्कर देण्यासाठी आले हे भारतीय अ‍ॅप, असा करा वापर

लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. वर्क फ्रॉम होम असो अथवा मित्र-नातेवाईकांसोबत चर्चा करण्यासाठी असो झूम, गुगल मीट  अशा अनेक अ‍ॅप्सची लोकप्रियता मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र सिक्युरिटी आणि प्रायव्हेसीच्या समस्येमुळे सरकारने झूम अ‍ॅप न वापरण्याचा नागरिकांना सल्ला दिला होता. सरकारने भारतीय व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग अ‍ॅप बनविण्याची देखील भारतीय स्टार्टअप्सला आवाहन केले होते. याचाच एक म्हणजे आता मुंबई येथील स्टार्टअप इनस्क्रिप्टने भारतीय व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग अ‍ॅप ‘से नमस्ते’ (Say Namaste) तयार केले आहे.

या आधी या याचे केवळ वेब व्हर्जनच उपलब्ध होते. मात्र आता ‘से नमस्ते’ अ‍ॅप गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवर देखील उपलब्ध आहे. कंपनीचे सीईओ अनुज गर्ग म्हणाले की, कंपनी युजर्सच्या प्रायव्हेसी आणि सिक्युरिटीला गंभीरतेने घेते.

Image Credited – Google

‘से नमस्ते’ अ‍ॅपमध्ये ग्रुप व्हिडीओ कॉलवर 50 जण सहभागी होऊ शकतात. या अ‍ॅपमध्ये स्क्रिन शेअरिंग, टेक्स मोड, फाईल शेअरिंग असे अनेक फीचर्स आहेत. व्हिडीओ कॉल सुरू असताना युजर्सला टेक्स मेसेज देखील पाठवता येईल. याशिवाय डॉक्यूमेंट्स, पीडीएफ, प्रेझेंटेशन, फोटो, व्हिडीओ फाईल्स देखील युजर व्हिडीओ कॉलिंग दरम्यान पाठवू शकतील.

जॉईन आणि मिटिंग रूम तयार करणे या अ‍ॅपमध्ये खूप सोपे आहे. यासाठी केवळ स्टार्ट अथवा जॉईन मिटिंग, क्रिएट कोड आणि कनेक्ट यावर क्लिक करावे. आतापर्यंत या अ‍ॅपला प्ले स्टोवर 1 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी डाऊनलोड केले असून, अ‍ॅपला प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवर 4.5 स्टार्स रेटिंग आहे.

Leave a Comment