राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 82,968 वर


मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. कारण काल दिवसभरात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत नवीन 2739 रुग्णांची भर पडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 82 हजार 968 झाला आहे. तर काल दिवसभरात राज्यातील 2234 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत राज्यभरातील 37 हजार 390 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा वेग वाढताना दिसत आहे. दरम्यान राज्यातील 42 हजार 600 कोरोनाबाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

काल झालेल्या मृत्यूपैकी 30 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील असून उर्वरित मृत्यू हे 3 मे ते 3 जून या कालावधीतील आहेत. या कालावधीत झालेल्या 90 मृत्यूपैकी मुंबई 53, मीरा भाईंदर 5, भिवंडी 3, ठाणे 9, उल्हासनगर 6, नवी मुंबई 6, सातारा 2, वसई विरार, अमरावती, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, सोलापूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 37 हजार 124 नमुन्यांपैकी 82,968 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 46 हजार 566 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 29 हजार 98 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. काल झालेल्या मृत्यूंपैकी 78 पुरुष तर 42 महिला आहेत. त्यातील 53 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 47 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 20 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 122 रुग्णांपैकी 69 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

Leave a Comment