दुटप्पी बॉलिवूड; साधु-संतांच्या हत्येवर चुप्पी आणि अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्तीसाठी एवढी तळमळ – कंगना

काही दिवसांपुर्वी अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीची श्वेत पोलीस कर्मचाऱ्याद्वारे करण्यात आलेल्या हत्येनंतर देशभरात हिंसाचार भडकला होता. यानंतर जगभरात Black Lives Matter कँपेन सुरू झाले होते. हॉलिवूड पाठोपाठ बॉलिवूड स्टार्स प्रियंका चोप्रा, करीना कपूर खान, दिशा पाटनी, करण जोहर या कलाकारांनी देखील या कँपेनला पाठिंबा देत, सोशल मीडियावर कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येवर दुःख व्यक्त केले. यावरून आता अभिनेत्री कंगना रणौतने कलाकारांच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधला आहे.

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगना म्हणाली की, काही आठवड्यांपुर्वी साधुंची हत्या करण्यात आली होती. मात्र त्यावर अद्याप कोणीही बोलले नाही. हे महाराष्ट्रात घडले, जेथे सर्वाधिक कलाकार राहतात. बॉलिवूड हे असेही हॉलिवूडकडून घेतलेले नाव आहे. हे कलाकार चर्चेत असलेल्या गोष्टीवर बोलतात. याद्वारे त्यांना दोन मिनिटांसाठी प्रसिद्धी मिळते. मात्र गोरे लोक हे कँपेन चालवत असतात. कदाचित त्यांच्यात स्वातंत्र्याच्या पुर्वीची गुलामी अजून आहे.

कंगना म्हणाली की, पर्यावरणाच्या मुद्यावर देखील हे कलाकार एका श्वेतवर्णीय मुलीला पाठिंबा देतात. मात्र अनेक महिला आणि मुले आहेत जे भारतात पर्यावरणासाठी कोणाचीही मदत न घेता अविश्वसनीय काम करत आहेत. काही जणांना तर पद्मश्री देखील मिळाला आहे. मात्र कलाकारांकडून त्यांना कधी पाठिंबा मिळत नाही. कदाचित साधू आणि आदिवासी लोक बॉलिवूड आणि त्यांच्या चाहत्यांसाठी आकर्षक नसतील.

Leave a Comment