‘थोडी जरी लाज असेल तर राजीनामा देऊन घरात बसा’, सोनू सूदकडे मदत मागणाऱ्या भाजप आमदाराला अलका लांबांनी झापले

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासाठी अभिनेता सोनू सूद मदत करत आहे. सोशल मीडियावर सोनू सूदकडे अनेकजण मदत मागत आहे. अशाच प्रकारे मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील भाजप आमदार राजेंद्र शुक्ला यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून सोनू सूदकडे कामगारांसाठी मदत मागितली. मात्र यावरून काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी आमदारावर जोरदार हल्ला केला आहे.

आमदाराने मुंबईत अडकलेल्या रीवा आणि सतना जिल्ह्यातील कामगारांची यादी बनवून ट्विटद्वारे सोनू सूदची मदत मागितली होती. यावरून आमदारावर निशाणा साधत अलका लांबा म्हणाल्या की देश आणि राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार असताना देखील सोनू सूदकडे मदत मागत आहेत. त्याऐवजी राजीनामा देऊन घरात बसा.

लांबा यांनी आमदारावर निशाणा साधत ट्विट केले की, डोळ्यांवर विश्वास बसत नाही की जे स्वतः आमदार आणि आधी मंत्री होते. मध्यप्रदेश आणि देशात त्यांचेच सरकार आहे. मुख्यमंत्री/पंतप्रधान यांच्याच पक्षाचा आहे. महाराष्ट्रात देखील यांचेच खासदार आणि आमदार आहेत. तरी देखील सोनू सूदकडे मदत मागत आहेत. थोडी जरी लाज असेल तर राजीनामा देऊन घरात बसा.

Leave a Comment