जगात प्रदुषणाचा स्तर एवढा वाढला आहे की स्वच्छ हवेत श्वास घेणे दुर्मिळ होत चालले आहे. शहरांची परिस्थिती आणखीनच खराब आहे. मात्र जगात सर्वात स्वच्छ हवा कोठे आहे माहिती आहे का ? वैज्ञानिकांनी असे ठिकाण शोधले आहे जेथे मनुष्याकडून पसरवण्यात आलेल्या एक कण देखील नाही. हे ठिकाण दक्षिण महासागरात असून, हा महासागर अंटार्कटिकाने वेढलेला आहे.
वैज्ञानिकांनी शोधले जगातील सर्वात स्वच्छ हवा असणारे ठिकाण
कोलराडो स्टेट यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी या भागाचा अभ्यास केला आहे जेथे लोकांमुळे कोणताही प्रभाव पडलेला नाही. वैज्ञानिकांनी आढळले दक्षिण सागराच्या वरती वाहणाऱ्या हवेत एयरोसॉल पार्टिकल्स नाहीत. हे पार्टिक्ल्स मनुष्याद्वारे इंधन, फर्टिलायझर, कचरा याद्वारे निर्मित होतात.
एयरोसॉल्सद्वारेच प्रदूषण होते. हे असे सॉलिड अथवा लिक्विड पार्टिक्लस असतात, जे हवेत तरंगतात. वैज्ञानिक थॉमस हिल यांच्यानुसार, एयरोसॉल्सच्या प्रॉपर्टीजला कंट्रोल करण्यासाठी दक्षिण समुद्रातील ढग ओशन बायोलॉजिकल प्रोसेसशी मजबूत जोडलेले आहेत. दक्षिण महाद्वीपात मायक्रोऑर्गनिझम्स आणि न्यूट्रिएंट्स असल्याने अंटार्कटिकामध्ये प्रदूषण नाही.
वैज्ञानिकांनी मरीन बाउंड्री लेव्हलद्वारे हवेचे नमुने घेतले. यानंतर वातावरणात मिळणाऱ्या मायक्रोब्स आणि या हवेत मिळणाऱ्या मायक्रोब्सची तुलना करण्यात आली. दुसऱ्या हवेतील एयरोसॉल्स येथे आढळले नाहीत.