राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 60 हजाराच्या टप्प्यावर


मुंबई : काल दिवसभरात राज्यात कोरोनाच्या तब्बल 2598 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 59,546 वर पोहचला आहे. यापैकी राज्यात सध्या 38,939 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, काल राज्यात 85 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 1982 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 698 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 31.26 टक्के आहे. राज्यातील मृत्यू दर 3.32 टक्के आहे.

काल झालेल्या 85 मृत्यूपैकी 37 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 15 ते 25 मे या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 48 मृत्यूपैकी मुंबई 22, सोलापूर 5, अकोला 4, औरंगाबाद 3, सातारा 3, ठाणे 3, वसई विरार 3, जळगाव, नांदेड, नवी मुंबई, पुणे, रायगडमधील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 19 हजार 417 नमुन्यांपैकी 59,546 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 12 हजार 745 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 35 हजार 122 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. काल झालेल्या मृत्यूंपैकी 60 पुरुष तर 25 महिला आहेत. त्यातील 45 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 31 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 9 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 105 रुग्णांपैकी 45 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

Leave a Comment