पुण्यातील कोरोनाबाधितांनी ओलांडला सात हजारांचा टप्पा


पुणे : काल दिवसभरात पुणे जिल्ह्यात तब्बल 369 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 7012 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे काल दिवसभरात 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यातील 85 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. राज्यात आतापर्यंत 1982 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात कोरोनाच्या तब्बल 2598 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 59,546 वर गेली आहे.

तर गेल्या २४ तासांत देशात ६,५०० नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांचा आकडा १ लाख ५८ हजार ३३३ झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने ४,५३१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ६७ हजार ६९१ जण बरे झाले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत जगात कोरोनाने ३ लाख ५९ हजार ९७१ लोकांचा जीव घेतला आहे. जगभरात सध्या २९ लाख ४४ रुग्ण उपचार घेत असून, २५ लाख ४१ हजार जण बरे झाले आहेत. उपचार घेणाऱ्यांपैकी २ टक्के रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

Leave a Comment