होऊ दे खर्च : लॉकडाऊनमध्ये पिझ्झा खाण्यासाठी या दोन मित्रांचा चक्क 400 किमी प्रवास

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन असल्याने लोक आपआपल्या घरात कैद आहेत. अशात ब्रिटनमधील 2 मित्रांनी पिझ्झा खाण्यासाठी तब्बल 400 किमी प्रवास केल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनमुळे त्यांच्या शहरातील सर्व मॅकडॉन्लड्सचे आउटलेट्स बंद होते. त्यामुळे त्यांनी 400 किमीचा प्रवास करत पीटरबर्ग शहरात जाऊन पिझ्झावर ताव मारला.

Image Credited – autocarindia

रयान हॉल आणि पॅसले हॅमिल्टन या दोन मित्रांनी आपल्या प्रवासात पिझ्झापेक्षा अधिक खर्च पेट्रोलवर केला. मात्र फास्ट फूटची आवड असणाऱ्या या दोघांना याचा कोणताही पश्चाताप नाही. हाउल ते पीटरबर्ग या प्रवासात त्यांनी 27 यूरोचे फ्यूल खर्च केले. तर चिकन मॅकनट मील, लार्ज बिग मॅक मील, दोन कोक, डबल चीजबर्ग अशा पदार्थांसाठी 20 यूरो खर्च केले.

Image Credited – navbharattimes

रयानने सांगितले की 15 मिनिटांसाठी 7 तासांचा प्रवास केला. हा प्रवास आम्ही आनंदाने साजरा केला व भविष्यात अशी संधी आल्यास पुन्हा असे करू.

Leave a Comment