विश्वविक्रम करण्यासाठी या पठ्ठ्याने चक्क एका मिनिटात घातले 32 टी-शर्ट

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घरात कैद असलेले लोक नवनवीन कला आत्मसात करत आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या मोकळ्या वेळेत लोक करत आहेत. अमेरिकेतील एका जोडप्याने असाच एक हटके कारनामा केला आहे. या जोडप्याने टी-शर्ट घालून विश्वविक्रम तोडला आहे. व्यक्तीने एका मिनिटात 32 टी-शर्ट घातले, जेणेकरून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तुटेल. यात व्यक्तीच्या पत्नीने देखील मदत केली.

डेव्हिड रश हे अमेरिकेच्या इडाहोमध्ये राहतो. त्यांनी एका मिनिटात 32 टी-शर्ट घालण्याचा कारनामा केला आहे. आपल्या घरातच त्यांनी पत्नी जेनिफरच्या मदतीने हा विक्रम केला.

या जोडप्याने आधीच रुममध्ये टी-शर्ट ठेवले होते. यानंतर डेव्हिड यांनी एकावर एक असे 32 टी-शर्ट घातले. या आधी एका मिनिटात 31 टी-शर्ट घालण्याचा विक्रम होता, जो डेव्हिड यांनी मोडला. डेव्हिड रश यांनी या आधी 100 पेक्षा अधिक गिनीज बुक वर्ल्ड विक्रम आपल्या नावावर केलेले आहेत. हनुवटीवर 6 मिनिटे सायकल पकडून ठेवण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर आहे.

Leave a Comment