लॉकडाऊन : आता गरमीने त्रस्त या घुबडांनी केली पूल पार्टी

उन्हाचा पारा मागील काही दिवसांपासून वाढत चालला आहे. उन्हाळ्यात तुम्ही अनेकांना पूल पार्टी करताना पाहिले असेल. मात्र सध्या सोशल मीडियावर घुबडांच्या पुल पार्टीचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसत आहे की गरमीमुळे असंख्य घुबड एकत्र येऊन टबमध्ये अंघोळ करताना दिसत आहेत.

पेपर नावाच्या ट्विटर युजरने हे फोटो शेअर करत लिहिले आहे. युजरने फोटो शेअर करत लिहिले की, एकाच कुटुंबातील 6 घुबड माझ्या मित्राच्या बागेत पूल पार्टी करताना आढळले. अनास्टेशिया सेलेस्टे एब्सशायरने हे फोटो काढले आहेत.

अनास्टेशिया सेलेस्टेने मित्रांना सांगितले की, हे घुबड दुसऱ्या दिवशी देखील घराच्या बागेत आले होते. 23 मे ला शेअर केलेल्या या फोटोंना आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिक जणांनी लाईक केले असून, अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment