राज्यात एका दिवसात सर्वाधिक 97 कोरोनाबाधितांचा मृत्यू


मुंबई : देशात कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकुळ घातला असून या व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून काल दिवसभरात राज्यात कोरोनाच्या तब्बल 2091 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 54,758 वर गेली आहे. राज्यात या पैकी सध्या 36,004 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, काल राज्यात 97 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 39 जण मुंबई, ठाण्यात 15, कल्याण डोंबिवली 10, पुण्यात 8, सोलापूरात 7, औरंगाबाद 5, मीरा भाईंदर 5, मालेगाव आणि उल्हासनगर 3, नागपूर आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात कालपर्यंत 1792 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे काल 1168 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कालपर्यंत राज्यातील पाठवण्यात आलेल्या 3 लाख 90 हजार 170 नमुन्यांपैकी 54,758 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 67 हजार 622 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 35 हजार 200 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 16,954 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

काल झालेल्या मृत्यूंपैकी 63 पुरुष तर 34 महिला आहेत. त्यातील 37 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 49 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 11 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 97 रुग्णांपैकी 65 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

Leave a Comment