राज्याचे माजी मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह


मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या जीवघेण्या रोगाला लगाम लावण्यासाठी राज्य सरकार आपल्या परीने सर्वतोपरी उपाययोजन करत आहे. पण आता कोरोना वॉरिअर्ससोबतच राज्यातील राजकीय मंडळींना देखील कोरोनाची लागण होत आहे. अशातच आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच लवकरच उपचारासाठी संबंधित नेत्याला मुंबईत आणण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

पण सरकारकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी रविवारी नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्राकडून सांगण्यात आले. त्याला त्यांच्या मुंबईतील कार्यालयाने दुजोरा दिला. गेल्याच आठवडय़ात चव्हाण हे मुंबईहून नांदेडला गेले होते. तेथे त्यांची चाचणी करण्यात आली असता अहवालात त्यांना संसर्ग झाल्याचे निषन्न झाले. त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना कसलाही त्रास होत नसल्याचे सांगण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आव्हाड यांची कोरोनाची चाचणी बाधिताच्या संपर्कात आल्यामुळे करण्यात आली होती. परंतु, ही चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर केवळ थकवा जाणवत असल्यामुळे आव्हाड घरीच आराम करत होते. पण काही दिवसांनी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले असून उपचारानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

Leave a Comment