काल दिवसभरात एकट्या मुंबईत 1751 कोरोनाबाधितांची नोंद, तर राज्यात 44585 कोरोनाबाधित


मुंबई : राज्याभोवती कोरोनाचा फार्स अजूनच घट्ट होत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. कारण काल दिवसभरात राज्यात कोरोनाच्या तब्बल 2940 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 44,582 वर पोहचली आहे. या पैकी राज्यात सध्या 30,474 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, काल राज्यात सर्वाधिक 63 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी मुंबईत 27 जण, पुण्यातील 9, जळगाव 8, वसई-विरारमध्ये 3, औरंगाबाद शहरात 3, साताऱ्यात 2, मालेगाव 1, कल्याण डोंबिवली 1, उल्हासनगर 1, पनवेल 1 तर नागपूर शहारात एकाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 1517 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल 857 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कालपर्यंत राज्यातील पाठवण्यात आलेल्या 3 लाख 32 हजार 777 नमुन्यांपैकी 2 लाख 88 हजार 195 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 44,582 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 69 हजार 275 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 28 हजार 430 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 12,583 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

Leave a Comment