लॉकडाऊन 4.0 : राज्याने जाहिर केली नवीन नियमावली


मुंबई : देशासह राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा बिमोड करण्यासाठी लॉकडाऊन जाहिर करण्यात असून देशात सध्या या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. चौथ्या टप्प्यातील या लॉकडाऊनमध्ये रेड, ऑरेंज, ग्रीन आणि कन्टेंन्मेंट झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. याच धर्तीवर आज राज्य सरकारच्या वतीनेही लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर केली असून मुंबई, पुणे (शहर), सोलापूर (शहर), औंरंगाबाद (शहर), मालेगाव, धुळे, नाशिक (शहर), जळगाव, अकोला आणि अमरावती या भागांमध्ये ही नियमावली लागू करण्यात येणार आहे. दरम्यान राज्यात रात्री 7 ते सकाळी 7 दरम्यान संचारबंदी कायम असणार आहे.


अशी आहे राज्य सरकारची नवी नियमावली

    • 65 वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडू नये
    • रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत सक्त संचारबंदी, जीवनावश्यक सेवा वगळता

 

राज्याची रेड झोन आणि बिगर रेड झोन अशी विभागणी

  • रेड झोनमध्ये मुंबई आणि एमएमआरमधील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महापालिका
  • उरलेले क्षेत्र बिगर रेड झोन क्षेत्र
  • कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी
  • कंटेन्मेंमट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होणार

रेड झोनमध्ये काय सुरू राहणार

  • अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने
  • इतर दुकानांना परवानगी, त्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार
  • स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारूची दुकाने सुरू करता येणार, दारूच्या होम डिलिव्हरी करता येणार
  • टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार
  • चार चाकीमध्ये 1+ 2 आणि दुचाकीवर एकालाच परवानगी
  • मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापने साफसफाईसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात सुरू ठेवू शकतात
  • दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू करण्याची परवानगी
  • विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी 5 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी

नॉन रेड झोनमध्ये काय नियम

  • स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार, पण सामुहिक जमावाला बंदी
  • आंतरजिल्हा बससेवा 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी
  • सर्व दुकाने आणि बाजारपेठा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहणार, मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते
  • आज शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या विपरित कोणतेही आदेश काढायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागणार
  • स्थानिक प्रशासन राज्य पातळीवर काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी न करता आपल्या स्तरावर वेगळे आदेश आणि निर्णय घेत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होते. हा गोंधळ होऊ नये म्हणून आता कोणताही निर्णय घेताना मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन घालण्यात आले आहे.

Leave a Comment