लॉकडाऊन 4.0 : जाणून घ्या राज्यातील रेड झोनमध्ये मिळणाऱ्या सुविधांबाबत


मुंबई – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली नुकतीच जाहिर केली आहे. सरकारने ही नियमावली जाहिर करतानाच राज्यातील रेड झोन शहरांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर या रेड झोनमध्ये कोणकोणती बंधने असणार आहेत याची माहिती देखील सरकारच्या वतीने देण्यात आली आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणती शहरांचा आहे रेड झोनमध्ये समावेश…

रेड झोनमध्ये असलेल्या महानगरपालिका

  • मुंबई महानगर प्रदेश (मुंबई महापालिकेसह, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी-निझामपूर, नवी मुंबई, वसई-विरार या महानगरपालिका)
  • पुणे महानगरपालिका
  • सोलापूर महानगरपालिका
  • औरंगाबाद महानगरपालिका
  • मालेगाव महानगरपालिका
  • नाशिक महानगरपालिका
  • धुळे महानगरपालिका
  • जळगाव महानगरपालिका
  • अकोला महानगरपालिका
  • अमरावती महानगरपालिका

 

रेड झोनमध्ये असलेल्या महानगरपालिकांच्या हद्दीत काय काय सुरू होणार?

  • मद्यविक्रीची दुकाने सुरू होतील/होम डिलिव्हरी सुरू राहील.
  • दवाखाने, खाजगी क्लिनिक्स सुरू ठेवता येतील.
  • अत्यावश्यक सेवांसाठी चार चाकी वाहनांना परवानगी. टॅक्सी, कॅब आणि रिक्षाला परवानगी नाही.
  • अत्यावश्यक असल्यासच दुचाकीला परवानगी
  • मालवाहतुक सुरू ठेवता येईल.
  • नागरी भागातील उद्योग/कारखाने सुरू करता येतील.
  • नागरी भागातील बांधकामे सुरू राहतील.
  • नागरी भागातील दुकाने मर्यादित स्वरूपात सुरू राहतील.
  • अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील.
  • अत्यावश्यक आणि अनावश्यक असलेल्या वस्तूंसाठी ई-कॉमर्स सेवा सुरू राहील.
  • सरकारी कार्यालये ५ टक्केच सुरू राहतील. कोणतीही खासगी कार्यालये सुरू करता येणार नाहीत.
  • बँका आणि आर्थिक व्यवहारांची कार्यालये सुरू असतील.
  • कुरीअर आणि पोस्ट सेवा सुरू असेल.
  • वैद्यकीय अत्यावश्यक वाहतूक करता येईल.
  • रेस्टॉरंट्स/किचन्समधून होम डिलीव्हरी मागवता येईल.
  • उप निबंधक/आरटीओ/उप आरटीओ यांची कार्यालये सुरू होतील.
  • देखभाल दुरुस्तीसाठी दुकाने/मॉल्स/व्यवसाय यांना काही काळ काम सुरू करता येईल. पावसाळ्यापूर्वीची काही तयारी करून ठेवता येईल. पण सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळातच हे सुरू ठेवता येईल. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारची विक्री करता येणार नाही.

Leave a Comment