धक्कादायक! राज्यात काल दिवसभरात कोरोनाबाधितांची आतापर्यंतची सर्वाधिक नोंद


मुंबई : देशासह राज्याभोवत कोरोना व्हायरसचा फार्स अधिकच घट होत आहे. त्यातच काल दिवसभरात राज्यात विक्रमी 2347 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. ही आतापर्यंतची एक दिवसातील सर्वात मोठी वाढ आहे. तर काल दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 600 जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील 7 हजार 688 जणांनी आतापर्यंत यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. काल 63 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 198 एवढी झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 33 हजार 53 झाला आहे. पैकी 24 हजार 161 रुग्ण अॅक्टीव असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 73 हजार 239 नमुन्यांपैकी 2 लाख 40 हजार 186 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 33 हजार 56 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 48 हजार 508 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 638 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 63 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील 38, पुण्यात 9, औरंगाबाद शहरात 6, सोलापूरमध्ये 3, रायगडमध्ये 3 आणि ठाणे जिल्ह्यात 9, पनवेल शहरात 1, लातूरमध्ये 1, तसेच अमरावती शहरात एकाचा कोरोनाने बळी घेतला.

Leave a Comment