राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजारांच्या पार


मुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचे सावट आपल्या देखील देशावर असून देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात असून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 30 हजार 706 झाला आहे. त्यात 1606 नवीन रुग्णांची भर पडली आहे. राज्यात काल 524 कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले असून राज्यभरात आतापर्यंत 7088 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या 22 हजार 479 रुग्णांवर राज्यात उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 61 हजार 783 नमुन्यांपैकी 2 लाख 31 हजार 071 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 30 हजार 706 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 34 हजार 557 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 48 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात काल दिवसभरात 67 मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी 22 मृत्यू हे गेल्या 24 तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील 41, पुण्यात 7, ठाणे शहरात 7, औरंगाबाद शहरात 5, जळगावमध्ये 3, मीरा-भाईंदरमध्ये 2, नाशिक शहरात 1 तर सोलापूर शहरामध्ये 1 मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 47 पुरुष तर 20 महिला आहेत. आज झालेल्या 67 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 38 रुग्ण आहेत तर 25 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहे. या 67 रुग्णांपैकी 44 जणांमध्ये (66 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Leave a Comment