मुंबईहून आलेल्यांमुळे कोल्हापूरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ


कोल्हापूर – कोरोनाबाधित सहा रुग्ण एकाच वेळी कोल्हापूरात आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली असून हे सर्वजण मुंबईहून परतलेले येथील स्थानिक नागरिक आहेत. पण मुंबईहून परतलेल्या या प्रवाशांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्यामुळे कोल्हापूरतील कोरोनाबाधितांची रुग्णांची ३५ वर पोहचली आहे.

कोल्हापूरातील कोरोना रुग्णांची आत्तापर्यंतची स्थिती नियंत्रणात होती. त्याचबरोबर कोल्हापूराच जे रुग्ण आढळून आले आहेत ते जिल्ह्याबाहेरुन आलेले आहेत. कोल्हापुरात कोरोनाच्या संसर्गाचा धोका मुंबई-पुण्यासारख्या महानगरांतून येणाऱ्या प्रवाशांमुळे वाढला आहे. दरम्यान काल सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून हे सर्वजण मुंबईहून येथे आल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये राधानगरी येथील २३ वर्षांचा तरुण, कागल तालुक्यातील सोनगे येथील ४५ वर्षांची महिला, जयसिंगपूर येथील १८ आणि २० वर्षांचे तरुण, गडहिंग्लज येथील ५७ वर्षाचा आणि भुदरगड येथील एक व्यक्ती करोनाबाधित आढळून आली आहे.

दरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे मुंबईहून झपाट्याने येणाऱ्या प्रवाशांचा भार कोल्हापूरला सोसेना झाला आहे. कोल्हापुरात आलेल्या ८६ हजार रुग्णांच्या तपासणी करण्याचे काम प्रलंबित आहे. अशात नव्याने प्रवाशांची भर पडणे हो सोसणारे नसल्यामुळे मुंबईतून कोल्हापूरला येण्यासाठी काही दिवस परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.

Leave a Comment