तुमच्यामध्ये कोणतीही कमतरता असली तरीही इच्छा शक्ती असल्यास तुम्ही सर्व गोष्टींवर मात करू शकता असे म्हटले जाते. असेच एक उदाहरण म्हणजे 27 वर्षीय विन्स ब्रॅस्को. 27 वर्षीय विन्स हा जगातील सर्वात कमी उंचीचा बॉडीबिल्डर आहे. त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.
हा आहे जगातील सर्वात कमी उंचीचा बॉडीबिल्डर
विन्सची उंची 4 फूट 1 इंच आहे. लहानपणापासूनच त्याला अकोन्ड्रोप्लासिया आजार आहे. यामध्ये व्यक्तीचा खांद्याची वाढ होत नाही. अमेरिकेच्या पेन्सलवेनिया येथे राहणारा विन्स मागील 8 वर्षांपासून बॉडीबिल्डिंग करत आहे. त्याला ‘मिनी हल्क’ नावाने ओळखले जाते.
विन्स फायर फायटर आहे. तो म्हणतो की, जे विचार करतात की मी काय करू शकतो, त्यांना मला दाखवायचे आहे की मी लहान असूनही सर्वकाही करू शकतो.
त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक वर्कआउटचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याचे इंस्टाग्रामवर 39 हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
