अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे


नवी दिल्ली – सलग दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहिर केलेल्या आर्थिक पॅकेजसंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. शेतकरी आणि मजुरांबरोबर छोट्या दुकानदारांसाठी त्यामध्ये भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे. 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर त्याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली.

 • आजच्या उपक्रमांमध्ये एकूण ९ उपाययोजना आहेत. स्थलांतरित मजुरांशी संबंधित ३, रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी १, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणारे, छोटे शेतकरी २, गृहनिर्माण १ इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे.
 • सर्व मजुरांना नियुक्तपत्र मिळणार
 • मुद्रा योजनेतून ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्यांना २ टक्क्यांची मदत
 • कमी भाड्यामध्ये मजूर आणि शहरी गरिबांना घर मिळणार
 • प्रवासी मजुरांसाठी भाडे तत्वावर घराची योजना
 • रेशन कार्डचा वापर संपूर्ण देशभरात कुठेही करता येणार, ‘एक देश एक रेशनकार्ड’ सरकारची नवी योजना
 • रेशन कार्ड नसलेल्यांना ५ किलो धान्य देणार
 • प्रवासी मजुरांना दोन महिन्यांचं धान्य देणार
 • मजुरांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होणार
 • मजुरांच्या मजुरीतील तफावत दूर करण्याचा प्रयत्न
 • आतापर्यंत दोन कोटी ३३ लाख मजुरांना काम दिलं
 • शहरातील बेघर नागरिकांना तीन वेळचं जेवण
 • स्थलांतरित मजूर आपल्या राज्यात परत जात आहेत त्यांनाही काम देणार
 • स्थलांतरित मजूर आणि इतरांच्या देखभालीसाठी राज्यांना ११,००० कोटी रुपये देण्यात आले आहेत
 • बचत गटांनी १ लाख २० हजार लिटर सॅनिटायझर बनवलं
 • १२ हजार बचत गटांकडून ३ कोटी मास्कची निर्मिती
 • गेल्या दोन महिन्यांत ७२०० बचत गटांची स्थापना
 • सहकारी-ग्रामीण बँकांसाठी २९ हजार ५०० कोटी रुपये
 • शहरी भागातील गरिबांना ११ हजार कोटी रुपयांची मदत
 • पिकांच्या खरेदीसाठी ६७०० कोटी रुपये
 • त्वरित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजावर मिळणारी सवलत आता ३१ मे २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.
 • शेतीसाठी ८६ हजार ६०० कोटींचं कर्ज दिलं आहे
 • महिन्याभरात २५ लाख किसान क्रेडिट कार्डचं वाटप
 • आज जाहीर करण्यात येणारे निर्णय हे शेतकरी, छोटे व्यापारी, स्थलांतरीत मजूर यांना दिलासा देतील
 • गरीब कल्याण योजनेतून मजुरांना मदत
 • वर्षभरात ३ कोटी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेतून कर्जाचा लाभ मिळाला
 • मजुरांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आर्थिक पॅकेजची घोषणा
 • स्थलांतरित मजुरांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करणार
 • मजूर, शेतकरी, फेरीवाले यांच्यासाठी खास आर्थिक पॅकेज

Loading RSS Feed

Leave a Comment