इंस्टाग्रामच्या नवीन अपडेटमुळे एकाचवेळी डिलीट करता येणार 25 कॉमेंट्स

फेसबुकच्या मालकीचे फोटो शेअरिंग अ‍ॅप इंस्टाग्रामने नवीन अपडेट जारी केले आहे. नवीन अपडेटमुळे युजर्सची सायबर बुलिंग सारख्या समस्येपासून काही प्रमाणात सुटका होणार आहे. कारण आता इंस्टाग्राम युजर्स एकाचवेळी 25 कॉमेंट्स डिलीट करू शकतात.

एकाच वेळी असंख्य कॉमेंट्स डिलीट फीचर ट्रोलर्सला रोखण्यास मदत करेल. जर एकाचवेळी अनेक कॉमेंट्सद्वारे ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे वाटत असल्यास या कॉमेंट्स एकदम डिलीट करता येतील. हे फीचर अँड्राईड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी जारी करण्यात आलेले आहे.

याशिवाय नवीन अपडेटमध्ये युजर्स ठरू शकतील की त्यांना कोण टॅग करू शकते व कोण नाही. या फीचरमध्ये युजरला Everyone, Only People You Follow आणि No One  असे तीन पर्याय मिळतील. यातील एक पर्याय युजर निवडू शकतील. नवीन अपडेटमध्ये युजरला पिन कॉमेंटचा देखील पर्याय मिळेल. म्हणजेच युजरला एखादे कॉमेंट आवडले तर त्याला पिन टू टॉप करता येईल. जेणेकरून ती कॉमेंट सर्वात वरती दिसेल.

Leave a Comment