येतोय एलजीचा रोटेटिंग डिस्प्लेवाला स्मार्टफोन

स्मार्टफोन बाजारात कोरियन कंपनी एलजी नव्या संकल्पनेचा एक फोन लवकरच आणत असून या फोनचा डिस्प्ले रोटेट होणारा असेल. आजपर्यंत रोटेटिंग कॅमेरावाले फोन बाजारात आले आहेत पण डिस्प्ले रोटेट होणारा हा पहिलाच स्मार्टफोन असेल.

 

या फोनमध्ये पहिल्या डिस्प्लेच्या खाली ४ इंचाचा आणखी एक डिस्प्ले असून तो युजर फिरवू शकेल. हा डिस्प्ले फिरवून मुख्य डिस्प्लेखाली लपविता येणार आहे. ‘विंग’ असे या स्मार्टफोनचे कोडनेम असल्याचे सांगितले जात आहे. प्रायमरी डिस्प्लेला उभ्या स्थितीतून आडव्या दिशेने नेले की मगच हा सेकंडरी डिस्प्ले दिसू शकेल. या डिस्प्लेमुळे युजर सहजरीत्या मल्टीटास्किंग पर्फोर्म करू शकेल. उदाहरणार्थ युजरला प्रायमरी डिस्प्ले मध्ये फोटो एडिटिंग अॅप सुरु करायचे असेल तर एडिटिंग टूल्स दुसऱ्या डिस्प्लेवर दिसतील.

 

हा फोन बाजारात कधी येणार त्याची तारीख जारी करण्यात आलेली नाही पण या वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत तो लाँच होईल असे सांगितले जात आहे. हा फोन ६४ एमपी प्रायमरी कॅमेरा आणि अत्याधुनिक प्रोसेसरसह आणि फाईव्ह जी ला सपोर्ट करणारा असेल असेही संकेत दिले गेले आहेत.

Leave a Comment