पायी घरी निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला, दोन अपघातांमध्ये 14 मजुरांचा मृत्यू


मुजफ्फरनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंधे बंद आहेत. पण यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या सहनशिलतेचा आता बांध फुटला आहे. हजारो स्थलांतरित मजूर गावाकडे पायपीट करत निघाले आहेत. पण याबरोबरच मजूरांच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे.

उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमध्ये झालेल्या दोन अपघातांमध्ये पायी घरी निघालेल्या 14 मजुरांचा मृत्यू झाला आहे. पायी जाणाऱ्या मजुरांना उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये एका बसने चिरडले आहे. 6 मजुरांचा या दुर्देवी घटनेत घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर 4 मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पंजाबहून हे मजूर पायी बिहारच्या गोपालगंज येथे चालले होते. ही घटना थाना नगर कोतवाली परिसरात मुजफ्फरनगर देवबंद सहारनपुर राजमार्ग टोलनाक्याजवळ घडली. बसचा ड्रायवर दारुच्या नशेत होता. घटनेनंतर बस ड्रायवरला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत बुधवारी रात्री महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशकडे निघालेल्या मजुरांच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातात झाल्याने त्यात 8 जणांनी आपला जीव गमावला.

मजूर आणि कामगारांना लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका बसला आहे. देशभरात गेल्या 51 दिवसांपासून विविध ठिकाणी स्थलांतरीत कामगार अडकून पडले आहेत. अद्यापही लॉकडाऊन संपण्याची चिन्हे नसल्याने मजूर कुठल्याही मार्गाने आपल्या घरी जाण्याचा मार्ग निवडत आहेत. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर-सहारनपूर महामार्गावरुन बिहारमधील स्थलांतरित मजूर आपल्या घरी पायी निघाले असताना ही दुर्देवी घटना घडली. पायी निघालेल्या मजूरांच्या एका घोळक्याला अचानक भरधाव बसने उडवले. यातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला.

दुसऱ्या एका घटनेत बुधवारी रात्री महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशकडे निघालेल्या मजुरांच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातात झाल्याने त्यात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 50 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मध्यप्रदेशातील गुना येथे हा अपघात झाला आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Comment