Video : वाइन पिण्यासाठी चालत्या ट्रकवर चढला हा पठ्ठ्या, पुढे काय झाले पहा

जगभरात सध्या लॉकडाऊन असल्याने तळीरामांचे हाल होत आहेत. मात्र अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एका पठ्ठ्याने तर वाइनसाठी कळसच गाठला. येथील एक व्यक्तीने चक्क रेड वाइनने भरलेल्या चालत्या ट्रकला लटकत वाईन पिल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे यावेळी तो व्यक्ती अर्धनग्न होता.

आरोपी गॅब्रियल मोरेनो कार चालवत असताना त्याने रेड वाईन असलेल्या ट्रक चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. ट्रकमध्ये काही समस्या असेल, असे वाटून ट्रकचालकाने ट्रक बाजूला घेतली असता. तेवढ्यात गॅब्रियल धावत जाऊन त्या ट्रकच्या बाजूला लटकतो. त्यानंतर ट्रकच्या टँकला असलेले वॉल्व उघडून वाइन पिण्यास सुरूवात करतो. मात्र वॉल्व सुरू राहिल्याने हजारो लीटर रेड वाईन रस्त्यावर वाहून गेली.

वाईन रस्त्यावर गळत असल्याचे लक्षात येतच ट्रकचालकाने ट्रक बाजूला घेत कॅलिफोर्निया स्टेट हायवे पेट्रोलला फोन करत या घटनेची माहिती दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून, या घटनेत जवळपास 3700 लीटर वाईन वाया गेली आहे.

Leave a Comment