नवीन सुझुकी स्विफ्टचे फोटो लीक, लवकरच होऊ शकते लाँच

सुझुकी स्विफ्ट हॅचबॅक जगभरात सर्वात लोकप्रिय बँड्स पैकी एक आहे. आता कंपनी नवीन मॉडेलसाठी अपडेट करण्याची तयारी करत आहे. सुझुकी स्विफ्ट फेसलिफ्ट सध्या डेव्हलप केली जात आहे. ज्याचे फोटो ऑनलाईन लीक झाले आहेत. लीक झालेले फोटो जापानमधील मॉडेलचे असले तरी या कारमध्ये झालेले सर्व बदल इतर देशांमध्ये देखील मिळतील. लीक फोटोवरून फेसलिफ्ट मॉडेल आधीच्या मॉडेलप्रमाणेच वाटत असले तरी, यात नवीनपणा दिसत आहे.

सुझुकी स्विफ्ट फेसलिफ्टमध्ये करण्यात आलेल्या बदलांमध्ये वेगळा बंपर, बदलेले ग्रील आणि मशीन्ड एलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. मागील भागात काय बदल करण्यात आले आहेत, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र कंपनी वेगळा बंपर आणि नवीन टेललाईट डिझाईन देण्याची शक्यता आहे. या हॅचबॅकसोबत नवीन रंगाचे पर्याय मिळण्याची शक्यता आहे. ज्यात फॅक्टरी पर्यायात ड्युल टोन कलर स्कीम देण्यात येईल. लीक झालेल्या ब्रोशरनुसार, कारमध्ये प्लेम ऑरेंजसोबत ब्लॅक रूफ आणि रश येल्लोसोबत सिल्वर रूफ रंगाचा पर्याय मिळू शकतो.

Image credited – NDTV

स्विफ्ट फेसलिफ्टमध्ये 1.2 लीटर ड्युलजेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 9 bhp पावर आणि 118 Nm पीक टॉर्क जनरेट करते. जपानमध्ये याचे हायब्रिड व्हर्जन लाँच करण्यात आले आहे. जे 0.3 बॅटरी पॅकसोबत येते. जे अधिक 10 kW आणि 30 Nm टॉर्क सप्लाय करते. या व्यतिरिक्त जेडीएम स्पेसिफिकेशन असणाऱ्या स्विफ्ट आरएससोबत 1.0 लीटर बूस्टरजेट टर्बो इंजिन देण्यात आले आहे. जे 101 बीएचपी पॉवर आणि 150 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. भारतात कारला केवळ ड्युअलजेट इंजिनसोबत येण्याची शक्यता आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये जापानमध्ये स्विफ्ट फेसलिफ्ट लाँच होऊ शकते. तर वर्षाअखेर जागतिक बाजारात लाँच होईल.

Leave a Comment