अवघ्या काही तासांमध्ये अंतराळात होणार आतिशबाजी

अंतराळ रहस्यमयी आहे. येथे अनेकदा आश्चर्यकारक गोष्टी पाहण्यास मिळतात. पुढील 24 ते 36 तासांमध्ये पृथ्वीवरून आकाशात आतिशबाजी पाहण्यास मिळू शकते. पृथ्वीच्या शेजारून आकाशातून चमकणारे धुमकेतू जातानाचे दृश्य सुंदर असेल. विना दुर्बिण हे दृश्य डोळ्यांनी पाहता येईल. मे महिन्यात असे दुसऱ्यांदा होणार आहे. 13 मे ला पृथ्वीपासून 8.33 कोटी किमी अंतरावरून जाणार आहे. याचे नाव कॉमेट स्वान असून, हे सध्या पृथ्वीपासून 8.50 कोटी किमी लांब आहे. यानंतर 23 मे ला कॉमेट एटलस पृथ्वीच्या शेजारून जाईल.

13 मे ला दिसणारे कॉमेट म्हणजेच धुमकेत स्वानचा एका एस्ट्रॉनॉमर मायकल मॅटियाज्जोने शोध लावला होता. मायकल सोलर अँड हेलियोस्फेयरिक ऑब्जवेटरीचे (SOHO) आकडे पाहत असताना, याचा फोटो दिसला. स्वान इंस्ट्रूमेंटचा उपयोग सौरमंडळातील हायड्रोजनचा शोध घेण्यासाठी वापर केला जातो.

धुमकेत स्वान केवळ त्या लोकांना दिसेल, जे भूमध्य रेषेच्या दक्षिणेत राहतात. भारत भूमध्य रेषेच्या उत्तरेला असल्याने, उघडळ्या डोळ्यांना लोकांना धुमकेत दिसण्याची शक्यता कमी आहे. भारतातील लोक दुर्बिणीने हे दृश्य पाहू शकतात. हे हिरव्या रंगात चमकताना दिसेल.

यानंतर 23 मे ला देखील आणखीन एक धुमकेतू पृथ्वीच्या शेजारून जाईल. याचा शोध 28 डिसेंबर 2019 ला लावण्यात आला होता. याचे नाव अमेरिकेच्या एस्टेरॉयड टेरेस्ट्रियल इंपॅक्ट लास्ट अलर्ट सिस्टमच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे.

Leave a Comment