
नवी दिल्ली – भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्राने काही दिवसांपूर्वी आपल्या हवामान अंदाजात पाकव्याप्त काश्मीरलाही समाविष्ट करून घेतल्यामुळे चावताळलेल्या पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्या हवामान अंदाजात भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश केला. पण, पाकिस्तान लदाखच्या हवामानाचा अंदाज वर्तवताना सपशेल तोंडघशी पडला असून त्यावरुन सोशल मीडियावर पाकिस्तानची चांगलीच नाचक्की होत आहे.
भारताची ‘कॉपी’ करणारे पाकडे पडले तोंडघशी; दिली लडाखच्या हवामानाची चुकीची माहिती
Not surprised to see that kind of tweet from #RadioPakistan, akhir unka science and technology ka minister @fawadchaudhry hai 😂😂😂😂😂#RadioPakistan #maths #Pakistan pic.twitter.com/xbRkkvBMsG
— Nitesh Yadav (@niteshyadav021) May 10, 2020
दरम्यान भारतीय हवामान खात्याने पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबाद या प्रदेशांतील हवामानाचा अंदाज देणे सुरू केले आहे. ५ मेपासून या भागांतील हवामानाचा जम्मू-काश्मीर हवामान विज्ञान उपविभागानुसार अंदाज दिला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून रविवारी पाकिस्तानी रेडिओवर जम्मू-काश्मीरचे हवामानाचे अंदाज दिले. त्याबरोबर त्यांनी हवामानाची माहिती ट्विटरद्वारेही दिली. पण लडाखच्या हवामानाची माहिती देताना त्यांनी मोठी चूक केली. पाकिस्तानी रेडिओने ट्विटमध्ये लदाखचे कमाल तापमान -४ डिग्री आणि किमान तापमान -१ डिग्री असल्याचे सांगितले आणि तेथेच त्यांनी घोळ केला. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी, लगेचच कमाल तापमान -१ डिग्री आणि किमान तापमान -४ डिग्री असे दाखवायला हवे होते, असे सांगत पाकिस्तानला चपराक लगावण्यास सुरुवात केली.
