देशातील 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये धुम्ररहित तंबाखू उत्पादन आणि थुंकण्यावर बंदी

कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभुमीवर 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सार्वजनिक ठिकाणी धुम्ररहित तंबाखू उत्पादन आणि थुंकण्यावर बंदी घातली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे. या संदर्भात जागरणने वृत्त दिले आहे.

आरोग्य मंत्रालयाने 1 एप्रिलला सर्व राज्यांना कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी धुम्ररहित तंबाखूचा उपयोग आणि थुंकण्यावर बंदी घालण्यास सांगितले होते. मंत्रालयाने म्हटले होते की, धुम्ररहित तंबाखू उत्पादन, पान मसाला आणि सुपारी चावल्याने लाळ निर्माण होते. यानंतर लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. ज्यामुळे कोरोना व्हायरसचा पसरतो. म्हणून या उत्पादनांवर बंदी घालण्यात यावी.

स्वैच्छिक आरोग्य संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावना मुखोपाध्याय म्हणाल्या की, आम्ही सरकारच्या या निर्णयाचे कौतूक करतो. आरोग्याच्या सुरक्षेसाठी आणि कोरोनाची लक्षणे रोखण्यासाठी आमचा सर्व धुम्रपान करणाऱ्या आणि तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना आग्रह आहे, योग्य वेळी हे व्यसन सोडा.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सच्या मानसोपाचर विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख प्रतिमा मुर्ति म्हणाल्या की, धुम्रपान केल्यामुळे कोव्हिड-19 चा धोका वाढत असल्याचे समोर येत आहे. धुम्रपान केल्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता बिगडते आणि इम्युनिटी कमी होते.

Leave a Comment