राज्याने ओलांडला कोरोनाबाधित रुग्णांचा 20 हजाराचा टप्पा


मुंबई – काल दिवसभरात राज्यात ११६५ नवे कोरोनाबाधित रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून आत्तापर्यंत ४८ जणांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार २२८ एवढी झाली आहे. राज्यातील ३३० कोरोनाबाधित रुग्णांना काल घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३८०० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २७ हजार ८०४ नमुन्यांपैकी २ लाख ०६ हजार ४८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २० हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४१ हजार २९० लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १३ हजार ९७६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. काल राज्यात ४८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ७७९ झाली आहे. मालेगाव शहरातील ८ मृत्यू हे २५ एप्रिल ते ८ मे २०२० या कालावधीतील आहेत. काल झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील २७, पुण्यातील ९, मालेगाव शहरात ८, पुणे जिल्ह्यात १, अकोला शहरात १, नांदेड शहरात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे.

काल झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर २७ महिला आहेत. काल झालेल्या ४८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २७ रुग्ण आहेत तर १८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. रुग्णांना असणाऱ्या इतर आजारांबाबत ९ जणांची माहिती प्राप्त झालेली नाही. उर्वरित ३९ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Leave a Comment