व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरमुळे एकाचवेळी 50 जणांना करता येणार व्हिडिओ कॉल


नवी दिल्ली – व्हॉट्सअ‍ॅपवरही ‘मेसेंजर रुम्स’ हे फीचर उपलब्ध होईल, असे फेसबुकने गेल्या महिन्यात सांगितल्यानंतर अँड्रॉइड अ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर या फीचरची कंपनीने टेस्टिंग सुरू केली होती. पण, आता मिळालेल्या नव्या माहितीनुसार स्मार्टफोनवर येण्याआधी हे फीचर व्हॉट्सअॅप वेबसाठी रोलआउट केले जाणार आहे. लवकरच व्हॉट्सअॅप वेबवर व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय असलेले हे फीचर उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओ कॉलिंगचे लॉकडाउनमुळे वाढलेले प्रमाण बघून गेल्या महिन्यात फेसबुकने मेसेंजर रूम्स हे नवीन फीचर आणले होते. याद्वारे 50 जणांना एकाचवेळी व्हिडिओ कॉल करता येणे शक्य आहे. फेसबुक मेसेंजरमध्येच मेसेंजर रूम्स हे फीचर क्रिएट करण्यात आले आहे. आता हे फीचर लवकरच व्हॉट्सअॅप वेबच्या युजर्ससाठी उपलब्ध होणार असल्याचे, व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व फीचर्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo कडून सांगण्यात आले आहे.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपकडून सध्या मेसेंजर रूम्सचा शॉर्टकट आपल्या वेब प्लॅटफॉर्मवर अ‍ॅड करण्याचे काम सुरू आहे. वेब व्हर्जन 2.2019.6 मध्ये हे फीचर उपलब्ध आहे. पण हे फीचर सर्व युजर्ससाठी अद्याप लॉन्च करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर फोनमधील मुख्य अ‍ॅपमध्ये मेसेंजर रुम्स हे फीचर वेगळे देण्याची कंपनीची योजना आहे. म्हणजे डॉक्यूमेंट्स आणि गॅलरी पर्यायांप्रमाणे मेसेंजर रुम्सचाही नवीन आयकॉन दिसू शकतो. हे फीचर पुढील महिन्यापर्यंत युजर्ससाठी उपलब्ध केली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment