2020-21 या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांमध्ये कोणतीही फी वाढ करु नये


मुंबई – राज्याच्या शिक्षण विभागाने 2020-21 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची फी वाढ करण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर शाळेची फी भरण्यासाठी पालकांना महिन्याचा किंवा तीन महिन्यांचा पर्याय देण्यात यावा, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मागील शैक्षणिक वर्षाची काही फी भरण्याची बाकी राहिली असेल तर ती भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती करु नये, असेही महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने म्हटले आहे.


लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षात शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. कोणत्याही शाळेने वार्षिक फी एकदम भरावी अशी सक्ती करु नये असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे. त्याऐवजी मासिक किंवा त्रैमासिक फी भरण्याचा पर्याय पालकांना द्यावा, असेही निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

Leave a Comment