दारु दुकाने बंद करण्याचे मद्रास उच्च न्यायालयाने दिले आदेश, होम डिलिव्हरीची दिली परवानगी


चेन्नई – राज्यातील सर्व दारुची दुकाने बंद करण्याचे तामिळनाडू सरकारला मद्रास उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. दारु विक्रीमुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याने उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला राज्यातील सर्व दारू दुकाने बंद करण्याचा आदेश दिला आहे.

तामिळनाडूमध्ये लॉकडाउनदरम्यान 7 मे रोजी पहिल्यांदा दारुची दुकाने सुरू झाली होती. पहिल्याच दिवशी तामिळनाडूमध्ये जवळपास १७० कोटी रुपयांच्या दारुची विक्री झाली. पण, 8 मे रोजी मद्रास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुन्हा एकदा तामिळनाडूमधील सर्व 3,850 दारु दुकाने बंद करण्याचा आदेश दिला आहे. पण दारुची विक्री ऑनलाइन आणि होम डिलिव्हरी करण्याची परवानगी यावेळी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने याचसोबत लॉकडाउन संपेपर्यंत दारुची दुकाने बंदच ठेवावीत असेही स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याने ऑनलाइन दारु विक्री आणि होम डिलिव्हरीला परवानगी देत, राज्यातील सर्व दारुची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयानेही यापूर्वी शुक्रवारी मद्याच्या दुकानांवर गर्दी उसळत असल्याने लॉकडाऊनच्या काळात थेट संपर्काशिवाय किंवा ऑनलाईन विक्री आणि घरपोच सेवा या पर्यायांचा विचार करावा, अशी सूचना राज्य सरकारांना केली आहे.

Leave a Comment