राज्यात काल दिवसभरात आढळले 1089 नवे कोरोनाग्रस्त; कोरोनाबाधितांचा संख्या 19,063


मुंबई : काल दिवसभरात राज्यात कोरोनाच्या तब्बल 1089 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,063 झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 37 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून काल झालेल्या मृत्यूपैकी 25 जण मुंबईचे तर पुण्यातील 10, जळगाव आणि अमरवती शहरामध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 731 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 169 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कालपर्यंत राज्यात पाठवण्यात आलेल्या 2 लाख 12 हजार 350 नमुन्यांपैकी 1 लाख 92 हजार 197 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत, तर 19,063 जण पॉझिटिव्ह आहेत. राज्यात सध्या 2 लाख 39 हजार 531 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 13 हजार 494 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 3301 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

काल झालेल्या मृत्यूंपैकी 19 पुरूष तर 18 महिला आहेत. त्यातील 17 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 16 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 4 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 37 रुग्णांपैकी 27 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment