1 ते 15 जुलैदरम्यान सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या रखडलेल्या परीक्षा


नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे थांबवण्यात आलेल्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या राहिलेल्या परीक्षा 1 जुलैपासून घेणार असल्याची मोठी घोषणा सीबीएसईने केली आहे. परीक्षा अर्धवट झाल्यामुळे दहावी-बारावीचे विद्यार्थी हवालदिल झाले होते. परीक्षा होणार की नाही अशी शंका त्यांच्या मनात होती. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा घेणार असल्याचे मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केले आहे.

दहावी आणि बारावीच्या कुठल्या विषयांचे पेपर कधी असतील याचे सविस्तर वेळापत्रक सीबीएसई बोर्ड जाहीर करेल. 1 ते 15 जुलैदरम्यान या रखडलेल्या परीक्षा घेण्यात येतील. कोरोनाच्या संकटाआधीच महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा पूर्ण झाली. पण दहावीची परीक्षा पूर्ण होऊ शकली नव्हती. एक पेपर राहिलेला असतानाच लॉकडाऊन सुरू झाल्याने दहावीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. पण राज्य बोर्डाने भूगोलाचा पेपर पुन्हा घेणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. हा पेपर आता होणार नाही. इतर विषयांच्या गुणावरून सरासरी गुण काढले जातील.

Loading RSS Feed

Leave a Comment