सर्वपक्षीय बैठकीला मास्क न घालताच पोहचले राज ठाकरे; दिली मिश्किल प्रतिक्रिया


मुंबई : गुरुवारी दुपारी 2 वाजता राज्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. सर्वच राजकिय पक्षांचे राज्यात मोठ्या प्रमाणात संक्रमित झालेल्या कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सहकार्य महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. पण सर्व राजकीय नेत्यांनी यावेळी मास्क घातलेला असताना मास्क न घालताच राज ठाकरे मंत्रालयात पोहोचले होते. त्याचबरोबर राज यांनी बैठकीला बसल्यानंतरही आपला मास्क टेबलवरच ठेवला होता. त्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान राज यांना मास्क का घातला नाही, असा प्रश्न केला असता, त्यांनी मास्क इतर सगळ्यांनी घातला आहे म्हणून मी नाही घातला, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली

विरोधी पक्ष नते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच माकप, भाकप, एमआयएम आणि शेतकरी संघटनेचे नेते या बैठकीसाठी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्य सरकारकडून या चर्चेत उप मुख्यमंत्री अजीत पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर, जयंत पाटील, राज ठाकरे, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई असे इतरही नेते या चर्चेत सहभागी झाले.

दरम्यान कोरोनाने राज्यात थैमान घातले असताना सार्वजनिक ठिकाणी मास्क कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी वापरणे बंधनकारक आहे. तसेच सार्वजनिक मास्क न वापरल्यास 1000 रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. पण मास्क न लावताच राज ठाकरे मंत्रालयात आल्याने त्यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment